Home > News > उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी :रेल्वेमंत्री पियुष गोयल

उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी :रेल्वेमंत्री पियुष गोयल

उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी :रेल्वेमंत्री पियुष गोयल
X

नवरात्राच्या मुहूर्तावर सरकारने मुंबईतील महिलांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महिलांना लोकल प्रवास खुला करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन मुळे गेल्या सहा महिन्यांपासून लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू होत्या पण आता महिलांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पत्र लिहून रेल्वेला महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली होती त्यावर अखेर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत उद्यापासून महिलांना लोकल प्रवास सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. पण संसर्गाची शक्यता असल्याने आणि लोकलमध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेतर्फे महिलांना सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सात नंतर लोकल प्रवास करता येणार आहे पण अत्यावश्यक सेवेतील महिलांना यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगीनुसार प्रवास करता येणार आहे.Updated : 2020-10-29T16:58:32+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top