Home > News > 'आरोग्याचा आधारस्तंभ' max woman संडे स्पेशल बुलेटीन

'आरोग्याचा आधारस्तंभ' max woman संडे स्पेशल बुलेटीन

आरोग्याचा आधारस्तंभ max woman संडे स्पेशल बुलेटीन
X

कोरोना योध्दे म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर डॉक्टर आणि पोलीसच उभे राहतात. अशात ग्रामीण भागात घराघरात जाऊन प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका दुर्लक्षीतच राहिल्या आहेत. असा हा ग्रामीण भागाच्या आरोग्याचा आधारस्तंभ max woman च्या नजरेतून मात्र सुटलेला नाही. या आरोग्य सेविकांना समर्पीत max woman चे संडे स्पेशल बुलेटीन....

जरा विचार करा... या कोराना काळात तुमच्या घरातील व्यक्ती आजारी आहे. तुम्ही त्या व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्यासाठी धडपड करताय. बाहेर खुप पाऊस आहे आणि लॉकडाउनमुळे गाड्यासुध्दा नाहीत. अशावेळी तुम्ही काय कराल?... घाबरलात ना...? पण काळजी करु नका कारण तुमची काळजी घेण्याकरीता आरोग्य सेविका खंबीर आहेत. अशाच आरोग्य सेविकांची आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत.

https://www.maxwoman.in/news-report/health-worker-pillar-of-health/16339/

कर्तव्य प्रमाण मानून गावच्या आरोग्यासाठी कोरोनाशी लढणाऱ्या नंदिनी दिवेकर या अंगणवाडी सेविका स्वतः गरोदर असून नववा महीना भरलेला असतानाही आपल्या वेदना बाजूला ठेवून जनजागृतीसाठी झटत असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथील एका मोहल्ल्यामध्ये त्या कोरोना व्हायरस संदर्भात माहिती देऊन काळजी घेण्याच्या सुचना देत असतानाच अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.... पुढे जे काही झालं वाचून तुम्ही ही म्हणाल 'तू सी ग्रेट हो'

https://www.maxwoman.in/personality/ninth-month-of-her-pregnancy-she-was-raising-awareness-about-corona/16326/

युद्ध जिंकण्यासाठी गाव पातळीवरील अंगणवाडी सेविका, आशाताई या महीला दारोदारी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत घरातच राहण्याचे आवाहन प्रत्येकाला करत आहेत. गावांमध्ये सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरिक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जाणून घ्या त्यांनी गावागावात कसं काम केलं...

https://www.maxwoman.in/videos/how-the-work-of-anganwadi-workers-is-going-on-at-the-village-level/16324/

मुंबईतील झोपडपट्टी परिसर म्हटलं की गर्दी ही आलीच. अशा ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग पाळणं म्हणावं तितकं सोपं नाही. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यसेविका प्रत्येक व्यक्तीला गाठून कोरोना बाबत माहिती देत आहेत. अतीशय तळागाळात काम करत आपलं अमुल्य योगदान देत आहेत.

https://www.maxwoman.in/news-report/health-workers-became-pillars-of-mumbaikars-in-the-battle-of-corona/16327/

अंगणवाडी सेवीका… एक अशी शिक्षीका जी तुमच्या मुलासाठी सर्व काही करते. कोरोना काळात याच ‘अंगणवाडीच्या बाई’ तुमच्या घरची खुशाली विचारायला आल्या असतील. पण एवढ्यावरच न थांबता या अंगणवाडी सेवीकांनी तुमच्या मुलाच्या सुरक्षेसाठी आता छोटे छोटे मास्क बनवायला सुरुवात केली आहे.

https://www.maxwoman.in/videos/keep-every-child-safe-anganwadi-worker-makes-masks-for-children-2/16328/

Updated : 30 Aug 2020 2:48 AM GMT
Next Story
Share it
Top