Home > News > महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उतरल्या रस्त्यावर

महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उतरल्या रस्त्यावर

केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे.

महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उतरल्या रस्त्यावर
X

मुंबई: घरगुती गॅस सिलेंडरमागे तब्बल 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला आघडीकडून आज राज्यभरात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक होताना पाहायला मिळाल्यात. तसेच यावेळी महिला कार्यकर्त्या यांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी थापत मोदी सरकारचा निषेध केला.





त्याचप्रमाणे जळगावाच्या जामनेर शहरांमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने नगरपालिका संकुलाच्या समोर रस्त्यावरच चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला व केंद्र सरकारचा निषेध करत, घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

Updated : 3 July 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top