Home > News > Lockdown पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

Lockdown पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

Lockdown पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
X

सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन महिन्यांचा लॉकडाउन म्हणत नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊन बाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

पंकजा मुंडे ट्वीट करत म्हणाल्या, 'लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची,अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरानाची साखळी कशी तोडणार? मजूर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.'

Updated : 11 April 2021 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top