Home > News > "बाबा मी येतेय..." दसरा मेळाव्या निमीत्त पंकजा मुंडे यांचं ट्वीट

"बाबा मी येतेय..." दसरा मेळाव्या निमीत्त पंकजा मुंडे यांचं ट्वीट

बाबा मी येतेय... दसरा मेळाव्या निमीत्त पंकजा मुंडे यांचं ट्वीट
X

आज दसरा त्यानिमित्ताने भाजपनेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी प्रमाणे दसरा मेळावा पार पडत आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन पार पडणार आहे. सावरगावच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे ऑनलाईन मेळावा घेणार आहेत.

या मेळाव्यापुर्वी त्यांनी भगवान बाबाच्या फोटो ट्विट करुन बाबा मी येतेय... असं ट्विट केलं आहे.गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व पार्श्वभूमिवर पंकजा मुंडे काय बोलणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Updated : 2020-10-29T16:52:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top