Home > News > मुंडेचा नातू कसा बसलाय...

मुंडेचा नातू कसा बसलाय...

मुंडेचा नातू कसा बसलाय...
X

पंकजा मुंडे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक भाषण किंवा सोशल मिडीयावरील पोस्ट मध्ये सातत्याने गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी झळकत असतात. दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडीया वर केलेल्या प्रत्येक पोस्ट मध्ये पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडें ना मिस करत असल्याचं दिसतंय.

दिवाळीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मोती साबण ( MOTI SOAP ) ची आठवण ही जागवलीय. उटणं, मोती साबण यांचा सुवास आणि गोपीनाथम मुंडे यांच्या आठवणी जागवताना गोपीनाथ मुंडे यांच्या फोटो समोरच्या खुर्चीत बसलेल्या मुलाचा फोटा ट्वीट करताना पंकजा मुंडे यांनी बाबा बघा नातू कसा बसलाय असं म्हणत आपल्या आठवणी शेअर केल्यायत.


Updated : 16 Nov 2020 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top