Home > News > "उद्धव ठाकरे भाजप सोबत आले तर.." काय म्हणाल्या पंकजा मुंडे..

"उद्धव ठाकरे भाजप सोबत आले तर.." काय म्हणाल्या पंकजा मुंडे..

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज बीडमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांच्या काय भावना आहेत त्या बोलून दाखवल्या. उद्धव ठाकरे यांच्या विषयी पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या पहा..

उद्धव ठाकरे भाजप सोबत आले तर.. काय म्हणाल्या पंकजा मुंडे..
X

राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत उभी फूट पाडत एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत चाळीसहुन अधिक आमदारांनी बंड केले. सध्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात खरी शिवसेना कोणाचे असा वाद सुरू आहे. अनेक बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा हात मिळवणी करावी अशी मागणी केली आहे. हे सगळं घडत असताना येत्या काही काळात राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना "बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सर्वांच्या मताचा आदर केला जातो. त्यानुसार खासदारांचे बहुमत आणि त्यांचे मत जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल. शिवसेना खासदारांचे मत द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने असले तरी यशवंत सिन्हा यांच्यासोबत आमच्या सदिच्छा कायम आहेत." असं वक्तव्य त्यांनी केले.

त्यामुळे शिवसेना भाजपने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने जर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर हा जुनी मैत्री जुळून येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला यावेळी त्यांनी "उद्धव ठाकरे भाजप सोबत आले तर त्याचा सर्वात जास्त आनंद मला होईल. उद्धव ठाकरे यांनी जर भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन दिलं तर या निर्णयाचे मी स्वागत करते असं त्या म्हणाल्या.

Updated : 12 July 2022 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top