Home > News > शिक्षक दिनानिमित्त पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट, म्हणाल्या...

शिक्षक दिनानिमित्त पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट, म्हणाल्या...

शिक्षक दिनानिमित्त पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट, म्हणाल्या...
X

Happy Teacher's Day 2021: दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा आदर करण्यासाठी शिक्षक दिन (Teacher's Day) भारतात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या शिक्षक, गुरु किंवा शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यात येतो. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा शिक्षकदिनानिमित्त फेसबुक पोस्ट करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्त करत लिहले आहे, "माझ्या परळी मधील शाळेतील आठवणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत... माझे मित्र मैत्रिणी आज ही कायम आहेत... आमच्यात एक खूप सुंदर बांधणारा धागा आहे...माझे सर्व शिक्षक खूप चांगले होते त्यांच्या मुळे मला खूप शिकायला मिळाले,नुसते पुस्तकात नाही जीवनात ही... मी परळी, मुंबई ते विवाहानंतर अमेरिका हा प्रवास केला..माझे राजकारणात येणे, बाबांचे जाणे, सर्व संघर्ष झेलणे त्यासाठी आवश्यक आत्मविश्वास मिळाला, हे माझ्या गुरूंनी मला प्रत्यक्ष- शिकवलंय हे नक्की .. भाषा, वक्तृत्व,आत्मविश्वास आणि स्वतः चा सम्मान करणे, उतार-चढ़ाव कितीही असो आपल्या संस्कार आणि शिकवणी पासून दूर न जाणे हे माझ्या माता पिता आणि शिक्षक यांच्यामुळे शिकले.. शिक्षक तणावमुक्त व्हावे त्यांनी शिक्षण उच्चतम दर्जावर नेऊन ठेवावे यासाठी सतत प्रयत्न झाले पाहिजे...शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व शिक्षक वर्गासमोर माझे नम्र अभिवादन आणि शुभेच्छा!!"

Updated : 5 Sep 2021 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top