Home > News > मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला :पंकजा मुंडे

मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला :पंकजा मुंडे

मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला :पंकजा मुंडे
X

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं आज पुण्यात निधन झालं. कोरोनातून बरं झाल्यानंतर सातव यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मात्र या आजारांशी त्यांची झुंज अपयशी ठरली. सातव यांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

काँग्रेसचे नेते आणि खा. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला, आशा शब्दात भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सातव यांना आदरांजली वाहिली.


गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः लक्ष ठेवून होते. मात्र आज सकाळी सातव यांच्या निधनाची दुःख बातमी आली.

Updated : 2021-05-16T14:26:02+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top