Home > News > शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेदला पाकिस्तानी चाहत्यांचे ताशेरे

शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेदला पाकिस्तानी चाहत्यांचे ताशेरे

शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेदला पाकिस्तानी चाहत्यांचे ताशेरे
X

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी चाहते मात्र दोघांना काही विसरले नाहीत. नवीन वहिनी काही चाहत्यांना आवडलेली दिसत नाहीय. काय आहे कारण हे जाणून घ्या....

शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेदवर पाकिस्तानी चाहत्यांनी ताशेरे ओढले आहेत. याचे कारण असे की

पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यादरम्यान सना जावेद स्टेडीयममध्ये उपस्थित होती दरम्यान, पाकिस्तानी चाहत्यांनी सानिया मिर्झाच्या नावाने सनाला चिडवले.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हे घडल्याने, पाकिस्तानी चाहत्यांच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हारायल होत आहे.

सना जावेदला सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

दोघांनीही सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये लग्न केले होते.

त्यांना एक मुलगा आहे.

या घटनेनंतर शोएब मलिकची नवी पत्नी सना जावेदला पाकिस्तानी चाहत्यांचा संताप सहन करावा लागत आहे.

पाकिस्तान सुपर लीग PSL मधील एका सामन्यादरम्यान सना जावेद स्टेडियममध्ये उपस्थित होती.

यावेळी काही पाकिस्तानी चाहत्यांनी तिला सानिया मिर्झाच्या नावाने चिडवण्यास सुरुवात केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये सना जावेद स्टेडियममधून बाहेर जाताना दिसत आहे.

तिला स्टेडियममधून बाहेर जाताना सुरक्षा रक्षक मदत करत असल्याचेही दिसत आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी सना जावेदला पाठिंबा दिला आहे.

तर काही लोकांनी पाकिस्तानी चाहत्यांच्या वर्तनावर टीका केली आहे.

तर काहींनी सना जावेदला या वादावर लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे.

Updated : 20 Feb 2024 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top