Home > News > कशेडी घाटात अपघात, बस 50 फूट दरीत कोसळली, मुलाचा मृत्यू १५ जखमी

कशेडी घाटात अपघात, बस 50 फूट दरीत कोसळली, मुलाचा मृत्यू १५ जखमी

कशेडी घाटात अपघात, बस 50 फूट दरीत कोसळली, मुलाचा मृत्यू १५ जखमी
X

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील 50 फुट दरीत कोसळली. या बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, पोलादपूर पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु आहे.

जवळपास 25 जणांना बाहेर काढले आहे. तर एका सात वर्षीय चमुकल्याने या अपघातात जीव गमावला आहे.

Updated : 31 Dec 2020 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top