Home > News > कंगनाचा आता महात्मा गांधीवर घसरली... म्हणाली म्हणाली दुसरा गाल पुढे केल्याने...

कंगनाचा आता महात्मा गांधीवर घसरली... म्हणाली म्हणाली दुसरा गाल पुढे केल्याने...

कंगनाचा आता महात्मा गांधीवर घसरली...  म्हणाली म्हणाली  दुसरा गाल पुढे केल्याने...
X

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या बॉलिवूड क्विन कंगना राणावतवर

देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असताना, कंगना राणावत काही थांबयच नाव घेत नाहीये. आता कंगना राणावतने महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान केल्याने ती पुन्हा टीकेची धनी ठरली आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. कानाखाली खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या या विधानानंतर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कंगना राणावतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे मेसेज पोस्ट केले आहेत. यामध्ये कंगनाने आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगनाने म्हटले आहे की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असं कंगणाने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

तर इन्स्टाग्राम स्टोरीजवर दुसऱ्या मेसेजमध्ये कंगना राणावतने लिहिलंय की, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. असे कंगनाने म्हटले आहे. दरम्यान कंगणाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated : 17 Nov 2021 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top