Home > News > औरंगाबादच्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी एका जणाला अटक; इतर आरोपींची ओळख पटली

औरंगाबादच्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी एका जणाला अटक; इतर आरोपींची ओळख पटली

औरंगाबादच्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी एका जणाला अटक; इतर आरोपींची ओळख पटली
X

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मंगळवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी एका शेत वस्तीवर धुमाकूळ घालत, दोन महिलांवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप वक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात सर्व आरोपींची ओळख पटवली असून, एका जणाला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच इतर सहा आरोपींची सुध्दा ओळख पटली असून, लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाणार आहे.

दरोडेखोरांनी महिलांवर केलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर औरंगाबाद शहरासह महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात होता. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन सरकारवर टीका केली होती. त्यामुळे पोलोसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचं मोठं आवाहन होतं. मात्र औरंगाबाद पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वतः बिडकीन पोलीस ठाण्यात तळ ठोकत तपासाचे चक्र फिरवले आणि अवघ्या दोन दिवसात आरोपीला अटक केली.

Updated : 22 Oct 2021 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top