Home > News > ट्विटर घेणार मोठा निर्णय? Elon Musk यांच्या मनात नेमक काय?

ट्विटर घेणार मोठा निर्णय? Elon Musk यांच्या मनात नेमक काय?

इलॉन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2% भागीदारी आहे. त्याच्याकडे ट्विटरचे 7.34 कोटी अधिक शेअर्स आहेत. या वृत्तानंतर इलॉन मस्क आता पराग अग्रवालची जागा घेणार का? किंवा पराग अग्रवाल हे केवळ नाममात्र सीईओ राहतील आणि इलॉन मस्क ट्विटरशी संबंधित सर्व आवश्यक पावले उचलतील का?

ट्विटर घेणार मोठा निर्णय? Elon Musk यांच्या मनात नेमक काय?
X

ट्विटरच्या फीचरबाबत इलॉन मस्क यांनी आज एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये तो युजर्सना विचारत आहे की तुम्हाला एडिट बटण हवे आहे का. एडिट बटन म्हणजे तुम्ही जे काही ट्विट केले आहे ते तुम्ही एडिट करू शकाल. समजा तुम्ही एखादे ट्विट केले असेल, पण नंतर त्या ट्विटमध्ये काही सुधारणा किंवा अपडेट करायचे असतील, तर नवीन फीचरमुळे तुम्ही ते करू शकाल.

खरं तर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2% भागीदारी आहे. त्याच्याकडे ट्विटरचे 7.34 कोटी अधिक शेअर्स आहेत. या वृत्तानंतर इलॉन मस्क आता पराग अग्रवालची जागा घेणार का? किंवा पराग अग्रवाल हे केवळ नाममात्र सीईओ राहतील आणि इलॉन मस्क ट्विटरशी संबंधित सर्व आवश्यक पावले उचलतील का? असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत..

आता elon musk यांनी केलेल्या ट्विटवर काय कॉमेंट्स आल्या आहेत हे देखील आपण पाहुयात..

ट्विटरवर Elon Musk यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विट वर आता अनेक रिट्विट येत आहेत. अनेक लोक या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहेत. या ठिकाणी व्यक्त होताना CZ Briance यांनी " स्पॅमपासून मुक्त होणे हे कदाचित प्रमुख प्राधान्याचे आहे असे म्हटले आहे"

Trukz या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, होय ट्विटर वरती edit करण्याचा इतिहास तपासला जाऊ शकतो?

Matt Wallace म्हणतात की Elon Musk हे वास्तविक जीवनात सुद्धा मक्तेदारीचा गेम खेळत आहेत.

होय, परंतु एक कालावधी देखील असावा अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून तो सुमारे 10 मिनिटे देऊ शकतो. असं johns यांनी म्हंटल आहे

Vuk vukovic म्हणतायत की, इलॉनला आधीच निर्णय घेतल्यावर या सर्वेक्षणांना विचारायला आवडते, म्हणून होय, आम्हाला Edit बटण मिळत आहे

अशाप्रकारे Elon Musk यांनी Do you want an edit button? या प्रश्नाला अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Updated : 5 April 2022 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top