Home > News > वृद्धेला मुलगा-नातवासह दोन सुनांनी लुटलं,१६८ तोळे सोनं आणि ७० लाख रूपये केले लंपास

वृद्धेला मुलगा-नातवासह दोन सुनांनी लुटलं,१६८ तोळे सोनं आणि ७० लाख रूपये केले लंपास

वृद्धेला मुलगा-नातवासह दोन सुनांनी लुटलं,१६८ तोळे सोनं आणि ७० लाख रूपये केले लंपास
X

सांगलीत एका ८० वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच मुलगा, नातू आणि सुनांनी मिळून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्वांनी मिळून या वृद्धेला कळू न देता, तिचं तब्वल १६८ तोळे सोनं आणि बँकेच्या खात्यावरील तब्बल ७० लाख रूपयांची रोकड परस्पर लंपास केली आहे. या प्रकरणी दोन सुना, नातू आणि नातवाच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

भंगरेवा महादेव बागदुरे या ८० वर्षाच्या असून त्या सोलापुरातील सैफुल परिसरात राहातात. त्यांना बॅंकेत गेल्यानंतर त्यांची फसणूक झालीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांचा स्वतःचा मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करुन या वृद्ध महिलेची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे राकेशचा मित्र माशाळ आणि शिवानंद नागपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भंगरेवा यांचे पती महादेव यांनी मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीच्या नावे ७० लाख रुपयांची ठेव ठेवली होती. तसेच, २० लाख रुपये हे जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून एका पतसंस्थेत ठेवले होते.

मात्र, आपला मुलगा, नातू तसेच दोन सुना यांनी बनावट कागपत्रे तयार करुन पतसंस्थेतील सर्व ठेवी स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचा आरोप तक्रारदार वृध्द महिलेने केला आहे. तसेच, १६८ तोळ्याहून अधिकचे सोने देखील काढून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे. तक्रारदार वृद्ध महिलेच्या पतीने आपल्या ठेवी एका पतसंस्थेत ठेवल्या होत्या. आरोपींनी हे पैसे कसे वळते केले या बाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

Updated : 29 Jan 2021 7:35 AM GMT
Next Story
Share it
Top