Home > News > ओलाने स्कुटरच्या किंमतीत केली वाढ, का वाढवली अचानक किंमत पहा...

ओलाने स्कुटरच्या किंमतीत केली वाढ, का वाढवली अचानक किंमत पहा...

ओलाने स्कुटरच्या किंमतीत केली वाढ, का वाढवली अचानक किंमत पहा...
X

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओलाने आपल्या स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ओलाने आज S1 Pro ची किंमत वाढवली आहे. आता Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. पूर्वीपेक्षा 10 हजार रुपयांनी ही किंमत वाढली आहे. ही गाडी 2021 मध्ये 1.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आले होते. Ola S1 Pro ची किंमत वाढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

S1 Pro स्कूटरची रेंज फक्त 131km आहे

ARAI नुसार Ola ची S1 Pro स्कूटर 185km च्या रेंजचा दावा करते, तर ती फक्त 131km ची रेंज मिळवते. त्याचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच, ते 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. Ola S1 Pro ला 3.97 kWh ची बॅटरी मिळते, जी चार्ज होण्यासाठी 6.30 तास लागतात.

स्कूटरमध्ये अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम आहे

त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंचाची टचस्क्रीन, एक डिजिटल स्पीडोमीटर, रिमोट पुश स्टार्ट/स्टॉप बटण, 36 लिटर स्टोरेज क्षमता आणि अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आहे. त्याच्या टायरला 12-इंचाचे अलॉय व्हील उपलब्ध आहे.

Ola S1 Pro मध्ये 10 वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे.

Ola S1 Pro मध्ये 10 वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. यामध्ये मिडनाईट ब्लू, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, अँथ्रासाइट ग्रे, मार्शमॅलो, मिलेनियल पिंक, कोरल ग्लॅम, पोर्सिलेन व्हाइट, निओ मिंट आणि जेट ब्लॅक यांचा समावेश आहे. अलीकडेच, ओला ही 5 महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी भारतातील नंबर-1 इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. तथापि, आगीच्या घटनांनंतर ओलाला 1,441 युनिट्स परत बोलवाव्या लागल्या आहेत.

Updated : 23 May 2022 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top