Home > News > तर किम यो जोंग होऊ शकतात जगातील पहिली महिला हुकूमशाह

तर किम यो जोंग होऊ शकतात जगातील पहिली महिला हुकूमशाह

तर किम यो जोंग होऊ शकतात जगातील पहिली महिला हुकूमशाह
X

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या असून त्यांची बहीण किम यो जोंग यांच्या हाती उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे गेली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. किम यो जोंग या भावा पेक्षा आक्रमक असल्याचं बोललं जातं. त्यातच किम यांनी काही दिवसांपूर्वीच किम यो यांच्या अधिकारात वाढ केल्याने अनेक देश चिंतेत आहेत.

किम यो या 32 वर्षाच्या असून त्यांना किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानलं जातं. किम जोंग यांनी काही दिवसांपूर्वी वेश्याव्यवसायाच्या आरोपातील 6 तरुणींवर गोळ्या झाडण्याचं फर्मान काढलं होतं. या निर्णयामागेसुद्धा बहिण किम यो जोंगचाच हात असल्याचं बोललं जातं. भाऊ किम जोंगच्या पाठिशी किम यो जोंग नेहमी सावलीसारख्या उभ्या राहिल्या आहेत.

किम यो जोंग पहिल्यांदा 2018मध्ये चर्चेत आल्या. जेव्हा त्यांनी ऑलिम्पिक दरम्यान दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी किम यो जोंग आक्रमक अंदाजात दिसत होती. यावेळी किम यो-जोंग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन बद्दल तीव्र वक्तव्य केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दक्षिण कोरिया सीमेवर सैन्य पाठवण्याची धमकी दिली होती.

किम यो जोंग एका हुकूमशहाची बहीण असूनही त्या प्रचंड लो प्रोफाईल आहेत. त्या पडद्यामागून किम जोंगचा सर्व कारभार पाहतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट असो किंवा इतर कोणत्याही देशाचा दौरा, आंतरराष्ट्रीय मीडियात किम जोंगची प्रतिमा रंगवण्याची सर्व जबाबदारी किम यो याच पार पाडत आल्या आहेत.

आता किम जोंग कोमात गेल्याने सध्या उत्तर कोरियाची सर्वेसर्वा किम यो जोंग आहे. तिच्या क्रूरतेचे किस्से ती सत्तेत येण्याआधीपासून चर्चेत आहेत. भावाच्या तावडीतून देश जरी सुटला, तरी तो आता बहिणीच्या ताब्यात गेला आहे.

Updated : 25 Aug 2020 7:47 AM GMT
Next Story
Share it
Top