Home > News > आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव घालावा लागतो धोक्यात

आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव घालावा लागतो धोक्यात

आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव घालावा लागतो धोक्यात
X

नाशि कः देशासह महाराष्ट्राचा विकास होतो आहे, असा दावा सर्वच पक्ष करत असतात...पण ग्रामीण महाराष्ट्रात विकास खऱंच पोहोचला आहे का, असा प्रश्न निर्माण करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे....उन्हाच्या झळा आता तीव्र झालेल्या आहेत. अनेक भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील मेटघर गावातल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी ५० फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून उतरावे लागत आहे. सटाणा तालुक्यातील रातीर येथे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले देखील होते. तालुक्यातील रातीर, सुराणे, रामतीर आदी खेड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरतेय, पण ढीम्म प्रशासनाला याचे सोयरसुतक नाही.


यावर्षी उन्हाच्या कडक झळा मार्चमध्येच बसू लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात आत्ताच पाण्याची भीषण टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आहे त्र्यंबकेश्वरच्या मेटघर या गावातील. हंडाभर पाण्यासाठी या ठिकाणच्या महिलांना मोठी पायपीट तर करावी लागतेच आहे पण पाणी काढण्यासाठी जीवघेणी धोक्यात घालावा लागत आहे. जीव धोक्यात घालून पाण्यासाठी येथील महिलांना थेट 50 फूट विहिरीत उतरावे लागत आहे.

ज्या जिल्ह्याची ओळख धरणांचा जिल्हा अशी केली जाते त्यात नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आता पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. आता व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहिलं तर ही दृश्य पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. एक महिला पाणी काढण्यासाठी विहिरीमध्ये उतरत आहे. विहिरीत उतरत असताना जर चुकून पाय घसरला तर जीव जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. या गावातील लोकसंख्या साधारण पाचशे आहे आणि पाचशे लोकवस्ती असलेल्या गावात सुद्धा आता पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाला की हे या महिलांना काही नवीन नाही. दर वर्षी ही समस्या आहेच. आदिवासी भागात दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईची समस्या उभी राहते. आता पाण्यासाठी महिलांना किती झगडावे लागणार आहे कोणास ठाऊक..?


Updated : 7 April 2022 3:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top