Home > News > देशातील सर्वात तरूण महिला अधिकारी महाराष्ट्राची नितीशा जगताप, कोण आहे नितीशा जगताप

देशातील सर्वात तरूण महिला अधिकारी महाराष्ट्राची नितीशा जगताप, कोण आहे नितीशा जगताप

महाराष्ट्रातील नितीशा जगताप हिने वयाच्या केवळ 21 व्या वर्षी UPSC मध्ये यश मिळवलं आहे. 12 वीत असल्यापासूनच ती UPSC पास होण्याचे ध्येय ठेऊन ती अभ्यास करत होती. याचं तिच्या संघर्षाला पदवी उत्तीर्ण होताचं यश मिळालं. नितीशाचा हा यशपर्यंतचा प्रवास कसा होता वाचा..

देशातील सर्वात तरूण महिला अधिकारी महाराष्ट्राची नितीशा जगताप, कोण आहे नितीशा जगताप
X

भारतीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक मुलांनी बाजी मारत यश संपादन केला आहे. यामध्ये लातूरच्या नितीशा जगताप हिने आपल्या पहिल्याचं प्रयत्नात 199 वे स्थान मिळवत घवघवीत यश प्राप्त केला आहे. अभिमानास्पद बाब ही की, नितिषा ही केवळ 21 वर्षांची आहे. त्यामुळे तिला मिळालेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील ट्वीट करत नितीशाचे कौतुक केले आहे.

युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा पदांसाठी उमेदवार निवडले जातात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रिलिम्स, मेन्स आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात. खरतर अत्यंत अवघड अशा समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत अनेक मुलं वारंवार अपयश पदरात पडूनही त्याच जोशना न डगमगता या परीक्षेत यशस्वी झालेल्या अनेकांच्या यशोगाथा तुम्ही पहिल्या असतील. पण पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत कठीण समजला जातं आणि अशाप्रकारे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारी काही ठराविकच नाव तुम्हाला माहित असतील. मागच्या काही वर्षांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणारा अन्सार शेख यांनी देखील पहिल्याच प्रयत्नात वयाच्या केवळ 21 व्या वर्षी ही परीक्षेत उत्तीर्ण केली होती.

त्यानंतर आता त्याच महाविद्यालयात शिकणारी महाराष्ट्रातील नितीशा जगतापने यश संपादन केले आहे. नितिषाने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून मानसशास्त्र विषयातून पूर्ण केलं. पण आपल्याला काय करायचं हे तिने आधीच ठरवलं होतं त्यामुळे बारावी उत्तीर्ण होताच तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर दोन वर्षे केलेल्या अफाट कष्टाला वयाच्या केवळ 21 व्या वर्षीच तीला फळ मिळालं. मुलगी आहे ती काय करू शकते? ही मुलींच्या हातची गोष्ट आहे का? मुलगी आहे घरीच राहिलेलं बरं! अशा फुशारक्या मारणार्यांना नितिषाने जोरदार चपराक लावली आहे. येणाऱ्या काळात निशा अशा अनेक मुलींना प्रेरणा देईल हे मात्र नक्की. आता निशाने गरजू लोकांच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अफाट परिश्रम हेच तिच्या यशच गमक आहे.

शुक्रवारी जो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला यामध्ये बिहारच्या शुभम कुमार याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातील 100 हून अधिक मुला-मुलींनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. मृणाली जोशी हिने राज्यात पहिलं स्थान पटकावत ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर विनायक नरवाडे हा महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आहे.

Updated : 16 March 2022 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top