Home > News > बाळासाहेब आणि मिणाताईंच्या नात्यावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या संजय राऊतला मत देणार का? - नितेश राणे

बाळासाहेब आणि मिणाताईंच्या नात्यावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या संजय राऊतला मत देणार का? - नितेश राणे

बाळासाहेब आणि मिणाताईंच्या नात्यावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या संजय राऊतला मत देणार का? -  नितेश राणे
X

राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यात शिवसेना आणि भाजप असा सरळ संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राउतांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे.

नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊत आणि संजय पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर नितेश राणेंनी शिवसेनेच्या आमदारांनाच प्रश्न विचारला आहे. संजय पवार आणि संजय राऊत असे दोन उमेदवार शिवसेनेने राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे आता शिवसेना कोणत्या संजयला सेफ करणार? जे संजय पवार प्रामाणिक राहिले त्यांना की ज्या संजय राऊत यांनी बाळासाहेब आणि माँसाहेब यांच्या नात्याबद्दल वादग्रस्त लेख लोकप्रभा मासिकात लिहिला होता. अशा संजय राऊत ला शिवसेनेचे आमदार मत देणार का? उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय पवार यांना सेफ करायला हवं तर ते त्यांनाच समजावत बसले आहेत. अशा शब्दात शिवसेना आमदारांना कोड्यात टाकलं आहे. एकंदरीत काय या राज्यसभा निवडणुकीत साम दाम दंड भेद या सगळ्यांचाच वापर भाजप करताना दिसणार आहे.Updated : 7 Jun 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top