Home > News > महाराष्ट्रात निर्भया? नागपुरहून पुण्याला येणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार!

महाराष्ट्रात निर्भया? नागपुरहून पुण्याला येणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार!

महाराष्ट्रात निर्भया? नागपुरहून पुण्याला येणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार!
X

नाशिक, लातूर, पिंपरी पाठोपाठ नागपुर-पुणे दुर्तगती महामार्गावर तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. मागील २ आठवड्यांमध्ये राज्यातील ही ४ थी अत्यंत गंभीर घटना आहे. आपण वारंवार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या बातम्या ऐकत असतो. मात्र २०२१ उजाडताच महाराष्ट्रात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहे. सर्वात आधी पिंपरीतील एका एअर होस्टेस तरूणीवर तिच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना समोर आली. त्यानंतर नाशिक, लातूर आणि आता नागपुर-पुणे महामार्गावर धावत्या बस मध्ये दोन वेळा बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे,

पीडित तरुणी मूळची गोंदिया जिल्ह्यातील असून, ती पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. पीडित तरूणीचं वय २४ वर्ष असून ती नागपूरहून पुण्याला निघाली होती. तिने नागपूरहून पुण्याला येण्यासाठी ५ जानेवारीला एक खासगी बस घेतली. याच खासगी बसमध्ये दोन वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. चाकूचा धाक दाखवून क्लिनरने तरुणीवर बलात्कार केला आहे. त्याचबरोबर बलात्काराची वाच्यता केल्यास बसमधून फेकून देण्याची धमकी ही या आरोपीनं दिली होती.

६ जानेवारीला सकाळी आपला जीव वाचवून कशीबशी पुण्यात दाखल झाल्यानंतर या तरूणीने लगेचचने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेनं पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. पुणे पोलिसांनी या बसच्या ड्रायव्हर आणि मुख्य आरोपी क्लिनर यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. जेव्हा या खासगी बसमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आला, तेव्हा ती खासगी बस वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात होती. त्यामुळं पुणे पोलीसांनी हे प्रकरण मालेगाव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. तसेच या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

सध्या या तरूणीवर बलात्कार करणारा मुख्य आरोपी बसचा क्लिनर आणि ड्रायव्हर दोघेही फरार आहेत. तसेच आरोपी क्लिनर हा नागपूरचा असल्यानं आणि पोलीसांना तो नागपूरमध्येच असल्याचा संशय असल्यानं पोलीसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. मात्र अलिकडे महाराष्ट्रात वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्राची मान खाली जात आहे.

Updated : 12 Jan 2021 6:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top