Home > News > BIG BREAKING: निखत जरीनला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक ; 4 वर्षानंतर भारताला गोल्ड

BIG BREAKING: निखत जरीनला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक ; 4 वर्षानंतर भारताला गोल्ड

BIG BREAKING: निखत जरीनला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक ; 4 वर्षानंतर भारताला गोल्ड
X

भारतीय बॉक्सर निखत जरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे. 25 वर्षीय निखतने फ्लायवेट प्रकाराच्या (52 किलोग्रॅम) अंतिम फेरीत थायलंडच्या जुतामास जितपोनचा पराभव केला. भारताच्या युवा बॉक्सरने ही लढत एकतर्फी 5-0 ने जिंकली आहे. महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल 4 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2018 मध्ये एमसी मेरी कोम चॅम्पियन बनली होती.

भारताचे आतापर्यंतचे 10वे सुवर्ण

महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताने 10 वे सुवर्णपदक जिंकले आहे. एकट्या एमसी मेरी कोमने 6 सुवर्णपदके जिंकली. भारताला आतापर्यंत 10 सुवर्ण, 8 रौप्य आणि 19 कांस्य पदके मिळाली आहेत. या स्पर्धेत 37 पदकांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाने सर्वाधिक 60 आणि चीनने 50 पदके जिंकली आहेत. या स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2006 मध्ये झाली आहे त्यावेळी देशाने चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी आठ पदके जिंकली होती.

अंतिम फेरीसाठी झालेल्या सामन्यात निखतने एकदम चांगली सुरुवात केली होती आणि पहिली फेरी ५-० अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बॉक्सरने पुनरागमन करत ३-२ असा विजय मिळवला आणि बाउटमध्ये परतण्याचे संकेत दिले. निखतने तिसऱ्या फेरीत पुन्हा आघाडी मिळवली आणि एकूण 5-0 अशा फरकाने सामना जिंकला.

Updated : 19 May 2022 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top