जगातील एक असा देश जिथं कोरोनाला No Entry, या पंतप्रधान बाईने करुन दाखवलं...
X
न्यूझीलंडच्या 'कोरोनामुक्तीला' आज म्हणजे 9 ऑगस्टला 100 दिवस पूर्ण झाले. या गेल्या 100 दिवसात न्यूझीलंडमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडमध्ये आता बहुतांश जणांचं दैनंदिन जीवन सुरळीत झालंय. रग्बीचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते, कुठल्याही भीतीविना लोक रस्त्यावर फिरतात, रेस्टॉरंटमध्ये जातात. हे करुन दाखवलय न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी
संपूर्ण जग कोरोना या साथीशी लढा देत आहे. या व्हायरसशी लढताना लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अशातच संपुर्ण जगासमोर न्यूझीलंड एक आदर्श होऊन समोर आला आहे. या देशाच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी लॉकडाऊनमध्ये कडक नियम आखत कोरोनाला नियंत्रणात आणलं. त्यामुळे या लेडी पंतप्रधानांचं जगभरात खूप कौतुक केलं जात आहे.
या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1500 इतकी आहे. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.