Home > News > चोरीच्या बातमीला अभिनेत्रीचा तोकड्या कपड्यांतील फोटो हवेत कशाला?

चोरीच्या बातमीला अभिनेत्रीचा तोकड्या कपड्यांतील फोटो हवेत कशाला?

न्यूज वेबसाइट डेक्कन हेराल्डने सोनम कपूरचे तोकड्या कपड्यांमधील फोटो तिच्या नवी दिल्लीमधील घरातील चोरीच्या बातमीसाठी वापरले आहे

चोरीच्या बातमीला अभिनेत्रीचा तोकड्या कपड्यांतील फोटो हवेत कशाला?
X

सध्या कुणाचा काळ सुरू असेल तर माध्यमांचा! ज्याचे मनी जे येई तो ते करी अशी अवस्था माध्यमांमध्ये आहे. कोणत्या बातमीला कोणते फोटो वापरले पाहिजेत याचाच काही माध्यमांना विसर पडलेला दिसतोय. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या दिल्लीतल्या घरी चोरी झाल्याच्या बातमीला सोनम कपूरचा तोकड्या कपड्यांमधील फोटो टाकला आहे. याची नेमकी गरज काय?

खरं तर, अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या राष्ट्रीय राजधानीतील निवासस्थानी फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती आणि रोख, दागिने आणि 2.4 कोटी रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची अधिकृत माहिती शनिवारी पोलिसांकडून जाहीर करण्यात आली.

घटनेची पुष्टी करताना पोलिस उपायुक्त (नवी दिल्ली जिल्हा) अमृता गुगुलोथ म्हणाले की, सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांच्या अमृता शेरगिल(दिल्लीतील मार्ग) येथील घरी चोरी झाल्याची तक्रार दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली होती.

डीसीपी गुगुलोथ म्हणाले की, तक्रारदाराच्या लक्षात आले की 11 फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता, तथापि, 12 दिवसांनंतर 23 फेब्रुवारी रोजी या घटनेची माहिती दिली, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कलम 381 (मालकाच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेची कारकून किंवा नोकराद्वारे चोरी) एफआयआर नोंदविला. तुघलक रोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

या घटनेच्या तपासासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली असून ते सध्या पुरावे तपासत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. "तपास अजूनही सुरू आहे," गुगुलोथ पुढे म्हणाले.



ही मुख्य बातमी होती. डेक्कन हेराल्ड या वृत्तसंस्थेने बातमीला सोनम कपूरचा तोकड्या कपड्यातील फोटो टाकला होता. चुक लक्षात आल्यानंतर तो बदलला देखील गेला. पण वेबसाईटवर एकदा का बातमीचा दुवा तयार झाला की त्यानंतर फोटो बदलला तरी तोच राहतो त्यामुळे ट्विटरवर या बातमीच्या त दुव्याला हाच फोटो दिसत आहे. पण तरीही प्रश्न हा उरतोच की बातमी जास्त व्हायरल होण्यासाठी माध्यमांकडून असे किती तोटके वापरले जाणार आहेत?

Updated : 9 April 2022 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top