Home > News > एकदा चार्ज केल्यावर 120 KM ची रेंज देणारी स्कुटर आता 79 हजार रुपयात...

एकदा चार्ज केल्यावर 120 KM ची रेंज देणारी स्कुटर आता 79 हजार रुपयात...

एकदा चार्ज केल्यावर 120 KM ची रेंज  देणारी स्कुटर आता 79 हजार रुपयात...
X

हैदराबाद मधील Pure EV या कंपनीने Etrance Neo स्कूटर लाँच केली आहे. ज्याची किंमत 78,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कुटर 120 किलोमीटर चालते तसेच, याचा टॉप स्पीड 60 किमी/तास इतका आहे. इतकेच नाही तर ही स्कूटर किंमतीच्या बाबतीत Ola S1 आणि TVS Eye Cube शी स्पर्धा करत आहे. या स्कुटरच्या तुलनेत याची किंमत कमी आहे.

5 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग धारण करणारी ही इलेक्ट्रिक स्कुटर

स्टार्टअप कंपनीने या EV स्कूटरबद्दल असा दावा केला आहे की, ती केवळ 5 सेकंदात 0 ते 40 kmph चा वेग पकडू शकते. तसेच, त्याची लोड क्षमता 150Kg पर्यंत आहे. यात पांढरा, लाल, निळा, काळा, ग्रे आणि सिल्व्हर असे एकूण 6 रंग पर्याय आहेत. या ई-स्कूटरला चार इंचाचा एलसीडी डिस्प्ले, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, एलईडी हेडलाइट आणि अँटी थेफ्ट स्मार्ट लॉक मिळतात.

पोर्टेबल बॅटरीची सुविधा

या इलेक्ट्रिक स्टार्टअपचे भारतातील 20 राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी डीलर आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.5kWH लिथियम बॅटरीद्वारे समर्थित आहे, जी BLDC मोटरशी जोडलेली आहे. यात पोर्टेबल बॅटरी आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ही बॅटरी सहज काढू शकता. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर इको मोडमध्ये 120KM पर्यंत रेंज देईल, तर तिचा टॉप स्पीड 60 kms आहे.

या सुकरचे स्पर्धक कोण आहेत?

ही स्कूटर Ola S1 आणि TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. Ola इलेक्ट्रिक Ola S1 ची किंमत रु.99,999 आहे. Ola S1 5 आकर्षक रंगांमध्ये येतो, जो मोठ्या बूट स्पेससह येते. यासोबतच यामध्ये आयकॉनिक हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर ताशी 90 किमीचा वेग गाठू शकते. तसेच, ते 3.6 सेकंदात 0-40 किमीचा वेग गाठते. हे एका चार्जमध्ये 121 किमीची रेंज देते. यासोबतच यामध्ये नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोडही आहेत.

Updated : 16 Nov 2021 4:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top