Home > News > 'साध्वी सावित्रीबाई फुले' नावामुळे पुण्यात वाद...

'साध्वी सावित्रीबाई फुले' नावामुळे पुण्यात वाद...

साध्वी सावित्रीबाई फुले नावामुळे पुण्यात वाद...
X

साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख पुण्यातील एका उद्यानाच्या फलकावर केल्यामुळे आता पुण्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. या फलकावरील साध्वी या नावास आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला आहे.


Asim Sarode - फेसबुक


सावित्रीबाई फुले यांच्या नावापूर्वी साध्वी हे नाव लावण्यात आल्याची बाब ADV. असीम सरोदे ( Adv. Asim Sarode ) यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून उघडकीस आणली. या सगळ्या प्रकरणामुळे सध्या महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपवर ( BJP ) टीका केली जात आहे. या सगळ्या बाबतीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा वादग्रस्त फलक 1991 सलीम काँग्रेसच्या काळातील असल्याचे म्हटले आहे.



Asim Sarode - फेसबुक

असीम सरोदे यांनी साध्वी ( sadhvi ) हे नाव आक्षेपार्ह असून सावित्रीबाई फुले ( savitribai phule ) या रचनात्मक काम करणाऱ्या समाजसुधारक होत्या. सावित्रीबाईंना साध्वी म्हणणे म्हणजे एकाच धर्मात त्यांना बांधून ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे आपण त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे म्हणू शकतो. असे म्हटले आहे. या सगळ्या नंतर काल काही राजकीय संघटनांनी जाऊन या फलकावरील साध्वी नाव पुसून टाकले आहे.



Asim Sarode - फेसबुक



Updated : 1 Oct 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top