Home > News > "झोपला होतात का भाजप सरकार असतांना.?" चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्याला प्रश्न करताच नेटकरी का संतापले?

"झोपला होतात का भाजप सरकार असतांना.?" चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्याला प्रश्न करताच नेटकरी का संतापले?

झोपला होतात का भाजप सरकार असतांना.? चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्याला प्रश्न करताच नेटकरी का संतापले?
X

भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कोकणाचा दौरा केल. या दरम्यान त्यांनी कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. चित्रा वाघ या थेट भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील मिर्ले गावात जाऊन धडकल्या. तेथील रस्त्याची दुरावस्था पाहुन त्यांनी, येथील सगळी सत्तास्थाने शिवसेनेकडे आहेत. खासदार राष्ट्रवादीचे आहेत. राज्यात आघाडी सरकार असताना मिर्ले धनगरवाडी रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल भास्कर जाधवांना विचारला. इकडे मुंबईत येऊन नेहमी तोंडाची वाफ घालवत भाजप विरोधात जोर लावत असता. पण तोच जोर तुमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी लावा. लहान मुलांना पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत जाता येईल याची व्यवस्था करा, असा सल्ला त्यांनी भास्कर जाधव यांना दिला.

चित्रा वाघ यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओवर मात्र नेटकरी चांगलेच संतापले आहेत. कमेंट मधून अनेकांनी चित्रा वाघ यांनाच लक्ष केले आहे. त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 158 लाइक्स व 33 रीट्विट्स आल्या आहेत. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न खरंच अत्यंत गंभीर आहे. मात्र तरीही या प्रश्नाचं राजकारण केलं जातंय का? म्हणून नेटकरी त्यांच्यानरच भडकले आहेत. चित्रा वाघ यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नक्की काय कमेंट केल्या आहेत ते आपण पाहूयात..

मच्छिंद्र नारोडे या ट्विटर वापरकर्त्याने चित्रा वाघ यांना उत्तर देत म्हटले आहे की, "त्या किशोर वाघ च्या actual उत्पन्न पेक्षा 90%जादा उत्पन्न कसे ते सांगा त्या मुलांना कमीत कमी त्यांची तुमच्या सारखी आर्थिक भरभराट होईल.2016 ACB logied केलेल्या केसेस ची स्थिती काय आहेत."

टेडी या नावाने असलेल्या ट्विटर वापरकर्त्याने चित्रा वाघ यांना रिट्विट करत म्हटले आहे की, ५ वर्ष गाव वाले झोपले होते का ? की तूम्ही झोपला होतात भाजप सरकार असतांना.? भास्कर जाधव तूमच पण चूकतय काम करा लोकांचे . आता लोक घाण टाकतील. महाराष्ट्र सुधारा घाणकरु नका. पैसा खायचा खा पण काम करा. आणी वाघ बाई रडणं कमी करा.

रवी चव्हाण हे चित्रा वाघ यांना फेसबुक आणि ट्विटरवरच्या बिनकामी नेते आहात असे म्हणत आहेत..

अशोक 008 या नावाच्या ट्विटर वापरकर्त्यांनी चित्रा वाघ यांना रिप्लाय देत म्हटले आहे की लाज सोडून तुमचं एखादं विकास काम सांगा मावशी आधी..

अभि पृथ्वी पर वापरकर्ते म्हणताहेत की, "काकू देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं पाच वर्षात, झोपलेले काय"

सुहास एस सोहोनी हे ट्विटर वापरकर्ते चित्रा वाघ यांना म्हणताहेत की' मॅडम ! काल मिर्ले गावच्या एका धीट चिमुरडीला भेटायला आपण दौरा केलात.त्या दरम्यान पक्ष कार्यालयाला भेट दिलीत. आणि आपल्या चैतन्यमय व्यक्तिमत्वाची तिथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तेवढ्या अल्प काळातही भुरळ पडली. सामान्य कार्यकर्त्यातून असं नेतृत्व मोठया प्रमाणात पुढे यायला हवं !

Updated : 2 Jun 2022 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top