Home > News > #UGCNET ; नेटचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता..

#UGCNET ; नेटचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता..

#UGCNET ; नेटचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता..
X

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने UGC NET डिसेंबर 2020 आणि जून 2021 परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. या संदर्भातील नोटीस UGC वेबसाइट ugc.ac.in आणि NTA वेबसाइट nta.ac.in वर जारी करण्यात आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत यूजीसी नेटचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे निकाल जाहीर केला जाईल. UGC NET निकालाची लिंक अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल.

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने (UGC) देखील आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर UGC NET 2021 निकालाच्या तारखेची सूचना शेअर केली आहे.

UGC ने जारी केलेल्या सूचनेनुसार, UGC NET चा निकाल 17 किंवा 18 फेब्रुवारी 2022 रोजी घोषित केला जाईल. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) निकालाबाबत यूजीसी आणि एनटीए एकत्र काम करत आहेत, असे यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेश कुमार यांनी म्हटले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत यूजीसी नेटचा निकाल जाहीर व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

यूजीसी नेट परीक्षेसाठी १२ लाखांहून अधिक उमेदवारांनी बसले होते. परीक्षेत बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर ugcnet.nta.nic.in वर भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतील.

Updated : 17 Feb 2022 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top