Home > News > भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक होणार?

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक होणार?

ऐरोली नंतर आता नेरूळ पोलिस स्थानकात गणेश नाईक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक होणार?
X

काही दिवसांपुर्वी भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात ऐरोली पेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या नंतर रविवारी नेरूळ पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाकडून त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नेरूळ पोलिस ठाण्यात देखील गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश यांना याप्रकरणी तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Updated : 17 April 2022 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top