Home > News > चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं चप्पला मारो आंदोलन

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं चप्पला मारो आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादीतर्फे चित्रा वाघ यांच्या बॅनरला मारले गेले जोडे

चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं चप्पला मारो आंदोलन
X

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुण्यात आंदोलन केले. मंगळवारी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या पीडितेने चित्रा वाघ यांनी जबाब देताना दबाव आणल्याचे आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज वाघ यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सुषमा सातपुते यांनी त्यांना विचित्रा वाघ म्हणत यांच्यावर निशाणा साधला. तसेच उपस्थित महिलांनी चित्रा वाघ यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारत निषेद व्यक्त केला.

नक्की काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पिडीतेने नेमके काय आरोप केले?

"मला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं गेलं होतं. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं होतं. याशिवाय मी जर कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू", अशी धमकी दिल्याचे आरोप पिडीतेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर लावले आहेत.

याशिवाय महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणेचा वापर करून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज केले गेले आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात

Feb पासून एकटी लढणार्या या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात तिने बोलताचं सगळे एकत्र तिच्या मदतीसाठी आलेत याचा आनंद वाटला..

मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे…

मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचंय काही अडचण असेल संपर्क करा जी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्की करू व करत राहू ….

Updated : 14 April 2022 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top