Home > News > सुप्रिया सुळेंसमोर कार्यकर्त्यांचा गदारोळ, माध्यमांना कॅमेरे बंद करायला लावले

सुप्रिया सुळेंसमोर कार्यकर्त्यांचा गदारोळ, माध्यमांना कॅमेरे बंद करायला लावले

सुप्रिया सुळेंसमोर  कार्यकर्त्यांचा गदारोळ, माध्यमांना कॅमेरे बंद करायला लावले
X

सोमवारी 18 एप्रिल रोजी खासदार सुप्रिया सुळे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिडको परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी काही कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेत, माध्यमांना कॅमेरे बंद करण्याची विनंती केली.

या गदारोळात खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पण या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना व्हिडिओ कॅमेरे बंद करायला लावले आणि हा मेळावा पक्षाचा अंतर्गत असून याची कुणीही प्रसारमाध्यमांनी बातमी करू नये अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांना केली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की त्यांच्या सभेचा आणि आपला काहीही संबंध नाही,अशा कितीही सभा होतील मात्र याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या मेळाव्यात दिला आहे.

Updated : 18 April 2022 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top