Home > News > परमबीर..! असं कसं चालेल

परमबीर..! असं कसं चालेल

परमबीर..! असं कसं चालेल
X

सचिन वाझे, परमबीर सिंह लेटर बॉम्ब आणि फोन टॅपिंगवरुन महाराष्ट्रात राजकीय द्वंद सुरु असताना महाविकास आघाडी आता विरोधकांवर पलटवार करत आहे. परमबीर..! असं कसं चालेल म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी परमबीर सिंग यांच्या अवैध संपत्तीचा उल्लेख करत चाकणकर यांनी त्यांच्यावर परखड टीका केली आहे.'नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं.'
म्हणत त्यांनी सिंग यांच्यावर टीका केली आहे. परमबीर यांच्या संपत्तीचे विवरण सोशल मिडीयावर मांडत चाकणकर म्हणतात, 'मुंबईत चार कोटी रूपयांचे दोन फ्लॉट तर हरियाणात आपल्या गावी त्यांनी चार कोटी रुपयांचे घर घेतल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती देखील आहे. अंधेरीतल्या वसुंधरा सोसायटीत 48.75 लाख रूपयांचा फ्लॉट घेतला आहे. तर 2019 मध्ये त्यांनी 14 लाख रुपयांची जमिन खरेदी केली आहे. हरियाणात त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या नावे संयुक्तपणे चार कोटी रूपयांचे घर आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Updated : 26 March 2021 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top