Home > News > ''उद्धव ठाकरे बंड मोडण्यात अयशस्वी का ठरले'' शरद पवार काय म्हणाले पहा..

''उद्धव ठाकरे बंड मोडण्यात अयशस्वी का ठरले'' शरद पवार काय म्हणाले पहा..

उद्धव ठाकरे बंड मोडण्यात अयशस्वी का ठरले  शरद पवार काय म्हणाले पहा..
X

भाजप लोकशाहीच्या सर्व संस्था सद्या उध्वस्त करत आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रानंतर गोव्यातदेखील असाच प्रयोग भाजप कडून राबवला जातोय असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मी मध्यावधी निवडणुका लागतील असं कधीच म्हटलं नाही, उलट आता फक्त अडीच वर्षेच राहिली आहेत आपण सर्वांनी आतापासून निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे, असं म्हटल्याचं शरद पवार यांनी सांगितलं, ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती द्या

शरद पवार महाविकास आघाडीचं सरकार का पडलं यावरही बोलले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आण... समर्थक आमदारांना सरकार पाडण्याच खर कारण सांगण्याच आवाहन केलं. "सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं. कुणी राष्ट्रवादीचे नाव घेतं, तर कुणी हिंदुत्वाचं , तर कुणी ईडीच. त्यांची ही सर्व कारणं सुरतला गेल्यानंतर ठरली. त्या आधी तसं काही कानावर आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते जनतेसमोर यावं आणि स्पष्ट करावं. त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही."

उद्धव ठाकरे बंड मोडण्यात अयशस्वी का ठरले

शरद पवार उद्धव ठाकरेंच्या अपयशाबद्दल म्हणाले की, " आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तरं दिलं असतं. राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा माझा अधिकार आहे, त्यांनाही तो अधिकार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांचा समावेश होता. आपली ती भूमिका नाही, भाजपसोबत जायचं नाही असं मी सांगितलं आणि ते परत आले. बाळासाहेब असताना असं काही घडल्यास वेगळी परिस्थिती असायची. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना हिंसक होऊ नका अशी आदेशवजा सूचना केल्यामुळे आज शिवसैनिक शांत असतील."

हे राज्यपाल जरा चमत्कारिक

शरद पवार यांनी आज कुणालाच सोडलं नाही त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यरी, यांच्यावर देखील ते चमत्कारिक असल्याची टीका केली. "आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरं सरकार आलं आणि त्यांनी ही मागणी 48 तासामध्ये मान्य केली. हे असं करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपणारे राज्यपाल मिळाले होते. हे आताचे जरा चमत्कारिक राज्यपाल आहेत, पण राज्यपाल असल्याने मी त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही" असा टोला शरद पवारांनी लगावला.

नामांतर या मुद्द्यावर चर्चाच झालेली नाही

शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावर थेट हात घातला, "औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं." यावरून आघाडी सरकारमध्ये शेवटच्या काही दिवसात आलबेल नव्हत असच दिसून येतं.

म्हणून राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली

"देशाच्या सर्व विरोधी पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार व्हावं अशी विनंती केली होती. पण त्यात यशाची टक्केवारी अगदी काठावर होती. तसंही माझ्यासारख्या व्यक्तीला लोकांपासून दूर जाणं जमलं नसतं, म्हणून मी ती उमेदवारी स्वीकारली नाही" असं शरद पवार म्हणाले. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे एकनाथ शिंदे यांच्या गटातले दीपक केसरकर हे एकेकाळी मनाने आणि शरीराने राष्ट्रवादीमध्ये होते असा टोलादेखील यावेळी शरद पवार यांनी लगावला.

Updated : 11 July 2022 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top