Home > News > "चंद्रकांत दादा सत्तेची स्वप्न सोडून सत्य स्विकारा" – रुपाली चाकणकर

"चंद्रकांत दादा सत्तेची स्वप्न सोडून सत्य स्विकारा" – रुपाली चाकणकर

चंद्रकांत दादा सत्तेची स्वप्न सोडून सत्य स्विकारा – रुपाली चाकणकर
X

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरुन आता राज्यात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण जोर धरु लागलं आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही चिमटा काढला.

चाकणकर यांनी "चंद्रकांत पाटील यांनी एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर कशाला १०५ आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं. त्यामुळं एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी अशक्य ते शक्य करून दाखवले त्याला एक वर्ष झालं. अजुन काही स्वप्न आहेत ते साकार होताना चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायचे आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवास्वप्न पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्विकारावं." असं म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल करोना लसीची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होता. तोच धागा पकडून, पंतप्रधान हे राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का, असा प्रश्न पाटील यांनी केला होता.



Updated : 29 Nov 2020 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top