Home > News > NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक...

NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक...

NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक...
X

एनसीबी च्या एका अधिकाऱ्याला ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई परळी रेल्वे पोलीसांनी केली असून त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हैदराबादहून पुण्याला निघालेल्या NCB अधिकाऱ्याने रेल्वेमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश चव्हाण असे या आरोपीचे नाव सांगितले जातय.

नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणचे ते रहिवासी आहेत. ज्या डब्यात ते प्रवास करत होते त्यात 25 वर्षीय महिला प्रवास करत होती. महिलेने त्या अधिकाऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांना आता लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल अशी माहिती औरंगाबाद लोहमार्गच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे.

Updated : 8 Oct 2021 12:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top