Home > News > नवरदेवाला मंडपात यायला उशीर झाला, मग काय मुलीच्या बापाने दुसर्यासोबत लावून दिले लग्न..

नवरदेवाला मंडपात यायला उशीर झाला, मग काय मुलीच्या बापाने दुसर्यासोबत लावून दिले लग्न..

नवरदेवाला मंडपात यायला उशीर झाला, मग काय मुलीच्या बापाने दुसर्यासोबत लावून दिले लग्न..
X

आये हम बाराती बारात लेके , दुल्हन को भी ले जायेंगे साथ लेके , अशी धून बँड बाजा वर वाजवीत नवरदेवाचे मित्र पोटात मदिरा घेऊन सैराट झालेय, नाचत गाजत वऱ्हाडी मंडळी लग्न लावण्यासाठी मंडपात गेली, नवरी ही सजून-धजून नटून थटून येणार बाई साजन माझा म्हणत नवरदेवाची वाट बघत भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागली, सर्वत्र लग्नाची जोरदार तयारी चालू झाली. वऱ्हाडी मंडळी येऊन मंडपात देखील बसली मात्र , त्याच वेळेस नवरीकडील मंडळींनी नवरदेव यायला उशिरा का झाला म्हणून लग्न मोडले आणि मुलीच्या वडिलांनी दुसर्या मुलासोबत मुलीचे लग्न लावून दिले. एवढेच नाही तर लग्नातील वऱ्हाडींना यावेळी लग्न जेवणा ऐवजी प्रसाद हि खावा लागला आणि आल्या पावली परत पाठवल्याने लग्न उशिरा लावणार्यांना मोठी चपराक दिलीय.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील कंडारी येथील पवार यांच्या मुलाचे मलकापूर पांग्रा येथील गवई यांच्या मुलीशी रीतीरिवाजाप्रमाणे लग्न ठरले होते, 23 एप्रिलला दुपारी लग्नाचा मुहूर्त होता त्यासाठी वराकडील मंडळी बँड बाजा घेऊन मलकापूर पांग्रा येथे नाचत गाजत दाखल झाले, दुपारचे लग्न होते, मात्र लग्न उशिरा आल्याने भेटीगाठी आणि वाघीणसा रात्री 8 वाजता झाला सर्वत्र लगीन घाई बँड बाजा वर वऱ्हाडी मंडळीनी ठेका धरलेला असे वातावरण असताना लग्नाला उशीर झाला म्हणून नवरीकडच्या मंडळींनी वराकडील मंडळींना तुम्ही उशिरा का आले? म्हणून विचारणा केली विचारता विचारता बोलाचाली झाली आणि वाद वाढला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर लोकांनी मध्यस्थी करून समजावून सांगितले माफीनामा देखील झाला , मात्र वधू कडील मंडळींनी आम्हाला या नवरदेवासोबत लग्न लावायच नाही , असे सांगून भर लग्न मंडपातून ओल्या हळदीच्या अंगाने लग्न न लावताच आल्या पावली परत पाठविले, त्यामुळे लग्न ठिकाणी एकच शांतता पसरली आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधुपित्याने शोधाशोध करून दुसरबीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत शुभमंगल उरकून दिलेय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचा बार ही उडवून दिला.

Updated : 28 April 2022 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top