Home > News > नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध;रश्मी बर्वेंच्या निकालावर स्थगिती !

नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध;रश्मी बर्वेंच्या निकालावर स्थगिती !

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल अखेर आला समोर आहे.

नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध;रश्मी बर्वेंच्या निकालावर स्थगिती !
X

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार होता. तसेच काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल निकाल आजचं लागणार होता. नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने तर रश्मी बर्वें यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या महत्वपुर्ण निकालाकडे राजकीय वर्तुळात सर्वांच लक्ष लागून होतं. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवणीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

काय होतं नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरण

सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, अडसूळ यांनी राणा यांच्या निवडणुकीला याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 'मोची' असल्याचे दाखवून मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने 3 नोव्हेंबर 2017 रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा आरोप अडसूळ यांनी केला होता.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट आहे आणि तो गैर पद्धतीने मिळवण्यात आला आहे, असे मुंबई हायकोर्टाने 8 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले होते. नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होत. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. 2021ला हायकोर्टाच्या निकालात नवनीत राणा यांनी बेकायदा कृत्य केल्याचं आढळून आल्यावर हायकोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र, त्यांनी काही दिवसांतच सुप्रीम कोर्टात अपिल केले. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने राणा यांची खासदारकी कायम राहिली. त्यानंतर साधारण अडीच वर्षांनंतर हा निर्णय आला आहे.

काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल...

त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांच्याही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल आज आला आहे. ज्यामध्ये जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची उमेदवारी न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे.

नवनीत राणांना दिलासा

याप्रकरणी आज अंतिम निकाल आला असून नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाच्या निकालाचं वाचन ओपन कोर्टात झालं आहे, यामध्ये आता हायकोर्टाने अंतिम सुनावणीअंती 9 एप्रिल 2019 रोजी राखून ठेवलेला निर्णय 8 जून 2019 रोजी देताना राणा यांचा जातीचा दाखला रद्दबातल केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने तोच जात दाखला वैध ठरवल्याने नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated : 4 April 2024 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top