Home > News > मुंबईकरांना गुदमरण्याची भीती ...

मुंबईकरांना गुदमरण्याची भीती ...

मुंबईकरांना गुदमरण्याची भीती ...
X


मुंबई आणि नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता घसरत चालली असून, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300 च्या पार गेल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसराला मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्थानिक नागरिकांनी पालिकेला अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याचे गांभिर्य लक्षात घेत नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची पालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळ वाट पाहात आहे का? असा प्रश्न आता स्थानिक रहिवासीय विचारत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी आता त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी एमआयडीसी आहेत. त्यामुळे कंपन्या रात्रीच्या अंधारात घातक धूर सोडतात, त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे.

यामुळे नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. वेळीच यावर उपाययोजना न केल्यास याचे परिणाम भयंकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भयंकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली नवी मुंबईची ही रात्रीची अदृश्य असल्याचे दिसून येत आहे.

Updated : 17 Jan 2023 6:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top