Home > News > 8 लाखांची लाच घेतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर जाळ्यात

8 लाखांची लाच घेतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर जाळ्यात

8 लाखांची लाच घेतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर जाळ्यात
X

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर या ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहे. सोबत त्यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यालाही लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे.

वैशाली वीर यांच्यावर 8 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी कारवाईने झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहिल्यांदाच शिक्षण विभागात कारवाई केली आहे.

दरम्यान वैशाली वीर यांनी ठाणे येथील एका संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता वैशाली वीर यांनी शिक्षक पंकज दशपुते यांच्या मध्यस्थीने 9 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडअंती ही रक्कम 8 लाख इतकी ठरली होती.

सदर 8 लाख रुपये वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना स्वीकारताना यांच्याकडे देतांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित केलेल्या रिक्त जागेवर वैशाली वीर यांची नियुक्ती करण्यात आली होती

Updated : 11 Aug 2021 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top