Home > News > मन सुन्न करणारी घटना!; नवऱ्याने पत्नीच्या खाजगी भागावर खिळे ठोकले

मन सुन्न करणारी घटना!; नवऱ्याने पत्नीच्या खाजगी भागावर खिळे ठोकले

महिलेने पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर तिचा मेडिकल करण्यात आले आहे

मन सुन्न करणारी घटना!; नवऱ्याने पत्नीच्या खाजगी भागावर खिळे ठोकले
X

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या खाजगी भागात खेळे ठोकल्याचा आरोप महिलेने केला आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून नवऱ्याने हे कृत्य केल्याचं समोर आलंय.

याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा दारू पिऊन घरी आला आणि त्याने माझ्यासोबत वाद घालायला सुरवात केली. यानंतर त्याने प्रथम अत्याचार केला आणि नंतर रागाच्या भरात माझ्या खाजगी भागात एक खिळे ठोकले. रात्री बाराच्या सुमारास जेव्हा मी आपल्या आई आणि वडिलांना आवाज दिला. पण कोणी माझा आवाज ऐकला नाही,असं पीडितेने म्हंटलं आहे.

यावर, स्थानिक पोलीस अधिकारी मिलक श्रीकांत प्रजापती यांनी म्हंटलं आहे की,आमच्या हद्दीतील एका महिलेने तक्रार दिली असून, पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर तिला मारहाण झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच रागाच्या भरात पतीने या महिलेच्या खाजगी भागात खिळे ठोकल्याच सुद्धा तक्रारदार महिलेनं आरोप केल्याचं, प्रजापती म्हणाले. महिलेच्या तक्रारीनंतर तिचा मेडिकल करण्यात आले आहे. मात्र नंतर दोन्ही पती-पत्नीमध्ये झालेल्या बैठकीनंतर प्रकरण मिटले असून, त्यांच्यामध्ये समझोता झाला आहे.

Updated : 1 Jun 2021 8:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top