Home > News > नागपंचमी : तब्बल साठ नागराज मंडळांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही

नागपंचमी : तब्बल साठ नागराज मंडळांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही

नागपंचमी : तब्बल साठ नागराज मंडळांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही
X

कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे यावर्षी नागपंचमी सणादिवशीही अंबामाता मंदिर भाविकांकरिता दर्शनासाठी बंद राहणार आहे. पोलिस व वनविभागाने नाग पकडले जाणार नाहीत, जिवंत नागाची पुजा केली जाणार नाही याकरिता चोख बंदोबस्त ठेवावा व नागांच्या स्पर्धा भरविताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावे. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले आहेत.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खंडीत झाली आहे. शिराळा गावातील ग्राम दैवत आंबामाता मंदिर दर्शनसाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान शेकडो वर्षे परंपरा असलेल्या मानाच्या प्रणव महाजन यांच्या पालखीस परवानगी देण्यात आलेली आहे. दहा लोकांनी मानाची पालखी भूई, कोतवाल यांनी महाजन यांच्या घरातून पालखीतून नागमूर्ती घेऊन कुरणे गल्ली, सोमवार पेठ, आंबामाता रोड वरून मंदिरात नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पूजा अर्चा होणार आहे. गावातील साठ नागराज मंडळांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही.

Updated : 25 July 2020 1:11 AM GMT
Next Story
Share it
Top