- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..
- रात्री सव्वा दोन वाजता विनायक मेटे यांचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज
- स्वाती काळे या महिला पोलीस रणरागिणीचा होणार सन्मान..

औरंगाबाद हादरले! एकच कुटुंबातील तिघांची हत्या; सहा वर्षांचा मुलगा जखमी
X
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकच कुटुंबातील तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. तर घरातील सहा वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत्यू झाला असे समजून सोडून दिल्याने सुदैवाने बचावला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पैठण शहरातील जुने कावसान भागात शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात राजू निवारे (40), अश्विनी राजू निवारे (35) व त्यांची मुलगी सायली निवारे (10) यांचा मृत्यू झाला आहे. तर राजू निवारे यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम याच्यावर सुद्धा हल्ला करत,मृत झाला समजून सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी स्थनिक पोलिस,श्वान पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.हल्लेखोर कोण होते आणि हत्येच्या मागील कारण समजू शकले नाहीत.