Home > News > "एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत" – कंगना राणावत

"एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत" – कंगना राणावत

मुंबई महापालिकेने कंगना विरोधातील प्रकरणात न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत – कंगना राणावत
X

अभिनेत्री कंगना राणावतने "उखाडलो जो उखाडना है" असं म्हणत मुंबई महापालिकेला आव्हान दिल्यानंतर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर कारवायी केली. या कारवाई विरोधात कंगनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. खटल्यासाठी महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणात पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत 11 वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या 7 लाख 50 हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे.

यावर कंगनाने ट्वीट केलं असून तिने "माझे घर बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 82 लाख खर्च केले आहेत. एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत. आज अशाठिकाणी महाराष्ट्र आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे." असं आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.


Updated : 28 Oct 2020 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top