Home > News > पोलीसाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक

पोलीसाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक

पोलीसाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक
X

मुंबईतध्ये एका महिलेने ट्राफिक पोलीस हवालदाराला भररस्त्यात मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. या पोलिसाने आपल्याला अश्लील शिविगाळ केल्याचा आरोप करत ही महिला पोलिसाला मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. पोलिसांनी याप्रकरणी ती महिला आणि तिच्यासोबत गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. ही घटना शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मुंबईतील काळबा देवी भागात घडली आहे. पोलीस वाहतूक नियमन करत असताना हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अडवले. यावेळी ती व्यक्ती आणि त्याच्यासोबतच्या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. संबंधित पोलीस त्यांच्याशी सर आणि मॅडम या भाषेत बोलत असताना या महिलेने शिविगाळ केल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओ ट्विट करत पोलिसांवर हल्ला कऱणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
Updated : 24 Oct 2020 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top