Home > News > चार तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलीसाला मारहाण, आरोपी अटकेत

चार तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलीसाला मारहाण, आरोपी अटकेत

चार तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलीसाला मारहाण, आरोपी अटकेत
X

घाटकोपर मध्ये चार तृतीय पंथीनी बेदम मारहाण केल्याचा घटना समोर आली आहे. लवली करण पाटील, विकी रामदास कांबळे, तनु राज ठाकूर,जेबा जयंत शेख अशी या चार ही तृतीय पंथीची नावे असून पंतनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वाहतुक विभागात कार्यरत असणारे पोलीस शिपाई विनोद बाबुराव सोनवणे हे घाटकोपरच्या छेडानगर सब वे येथे कर्तव्यावर असताना, एका रिक्षातून 4 व्यक्ती प्रवास करताना त्यांनी पाहिले. त्यांनी ई चलन कारवाई करण्यासाठी रिक्षाचा फोटो काढला असता त्या रिक्षात बसलेल्या या चार तृतीयपंथीनी रिक्षातुन खाली उतरून सोनवणे याना शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली.

एवढेच नाहीतर त्यांच्या युनिफॉर्म च्या शर्ट ची बटन तोडली तसेच लवली पाटील ने सोनवणे यांचे डोक्यातील टोपी खाली पाडून त्यांचा वॉकी टॉकी तोडला. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी कलम 353,332,294,427,504,34 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Updated : 18 Feb 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top