Home > News > कंगना हाजिर हो! मुंबई पोलीसांचं कंगनाला समन्स…

कंगना हाजिर हो! मुंबई पोलीसांचं कंगनाला समन्स…

कंगना हाजिर हो! मुंबई पोलीसांचं कंगनाला समन्स…
X

बॉलीबुडची क्वीन कंगना राणावत हिच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. नोव्हेंबरमध्ये जावेद अख्तर यांनी दिलेल्या एका तक्रारीवरून मुंबई पोलीसांनी शुक्रवारी जुहू पोलीस ठाण्यात कंगनाला चौकशीसाठी बोलावलं आहे.

कंगना गेल्या काही काळापासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येला कंगनाने बॉलीवुडला जबाबदार धरत अनेक बड्या कलाकारांवर तोंडसुख घेतलं. अनेक कलाकारांवर गंभीर आरोप केले. मुंबई पोलीसांवरही सुशांत सिंग राजपुतची आत्महत्या नसुन हत्या आहे. आणि मुंबई पोलीस मुद्दाम चुकीच्या मार्गाने चौकशी करत आहेत. असं म्हणत मुंबई पोलीसांवरही आक्षेपार्ह टिका केली होती.

कंगना येवढ्यावरच थांबली नाही, तर तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सुशांतच्याच प्रकरणावरून आगपाखड केली. कंगनाने वारंवार मुंबई पोलीस, महाविकास आघाडीचे नेते आणि बॉलीवुडवर सोशल मीडियावरून हल्ले केले आहे. तिने वारंवार केलेल्या हल्यांमुळे आता तिला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लेखक जावेद अख्तर यांचा सुशांत सिंग प्रकरणाशी काहीही संबंध नसताना, त्या संधर्भात एका वृत्तवाहीनीवरील मुलाखती दरम्यान कंगनाने त्यांच नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केलाय. त्याचबरोबर कंगनाने या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी तिच्या आणि ऋतिकच्या नात्याबद्दल गप्प राहावं म्हणून कंगनाला धमकावल्याचं म्हंटल होत.

मुंबईच्या अंधेरीतील मुख्य दंडाधिकाऱ्यांकडे नोव्हेंबर २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात आब्रुनुकसानीची आणि बदनामीची तक्रार दाखल केली होती. डिसेंबर २०२० ला दंडाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरण जुहू पोलीसांकडे वर्ग करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाचे सर्व पुरावे जमा करून जुहू पोलीसांनी कंगनाला २२ जानेवारी २०२० ला चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

कंगना या चौकशीला समोरे जाणार की वांद्रे पोलीसांना जसं तिने वारंवार टाळलं तसं जुहू पोलीसांनाही ती टाळणार हे पाहावं लागणार आहे.

Updated : 21 Jan 2021 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top