Home > News > अपहरण झालेल्या बाळाची तेलंगणामधून सुटका, मुंबई पोलिसांची कामगिरी

अपहरण झालेल्या बाळाची तेलंगणामधून सुटका, मुंबई पोलिसांची कामगिरी

मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे आई आणि अपहरण झालेल्या बाळाची पुन्हा भेट झाली आहे.

अपहरण झालेल्या बाळाची तेलंगणामधून सुटका, मुंबई पोलिसांची कामगिरी
X

मुंबईतील अंधेरी परिसरात रस्त्यावर राहणाऱ्या एका महिलेच्या 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाले होते. या प्रकरणात कोणताही माग नसताना जुहू पोलिसांच्या टीमने अपहरणकर्त्याला शोधून काढले आणि बाळाची तेलंगणामधून सुटका करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची विक्री करणारे मोठं रॅकेटही समोर येण्याची शक्यता आहे. अवघड वाटणाऱ्या या गुन्ह्याचा तपास तत्परतेने करणाऱ्या पोलिसांचा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहआय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


11 नोव्हेंबर रोजी अंधेरीमध्ये एका फुटपाथपर झोपलेल्या महिलेच्या 4 महिन्यांच्या बाळाचे रात्रीच्या वेळी अपहऱण करण्यात आले. पोलिसांना कोणताही पुरावा मिळत नव्हता. पण य़ा परिसरातील अनेक सीसीटीव्हींच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेतला. अखेर एका ठिकाणी पोलिसांना थोडी माहिती मिळाली आणि त्यांनी तपास केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तेलंगणामधील नालगोंडा इथे चार लाखात त्या बाळाला विकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमने तेलंगणामध्ये जाऊन त्या बाळाची विक्री करणाऱ्या डॉक्टरला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हैदराबाद इथून एका जोडप्याच्या ताब्यातून ते बाळ सुखरुप परत आणले.


मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे आज एक आई आणि बाळाची पुन्हा भेट झाली. हे अवघड काम पूर्ण करणाऱ्या पोलिसांचा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहआय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Updated : 20 Nov 2020 2:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top