Home > News > मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी...
X

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना अनेक धमकीचे फोन येत आहेत. शरद पवार, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता मुंबईच्या महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांनाही एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना २१ डिसेंबरला संध्याकाळी ६ च्या सुमारास एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता. फोनवरून समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना शिवराळ भाषेत बोलत, जीवे मारण्याची धमकी दिली. समोरून बोलणारा माणूस हिंदीतून बोलत होता.

हा फोन आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २३ डिसेंबरला आझाद मैदान पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार पोलीसांना फोन करणाऱ्यांचा तपास लागला असून संशयित आरोपींना आणण्यासाठी पोलीसांची एक तुकडी गुजरातला रवाना झाल्याची माहिती आहे.

पोलीसांनी या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत या घटनेवर बोलणं टाळलं आहे. येत्या भरातच मुंबई महापालिकेच्या निवडणूका आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना अशा धमक्या येत असतील तर येणारी निवडणूक ही काही अंशी धोक्याची असू शकण्याची शक्यता आहे. तसेच सदरचा आलेला हा फोन देखील राजकीय व्यक्तींच्या पाठबळाने आलेला असू शकतो अशी शक्यता किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.


Updated : 6 Jan 2021 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top