Home > News > मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
X

मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

किशोरी पेडणेकर यांना शनिवारच्या रात्रीपासून (१७ जुलै) छातीत त्रास होत होता. तर सकाळी त्रास अधिक वाढल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौर कार्यालयाने याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र प्रकृती बरी वाटत असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

निधनाची अफवा...

किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनतर त्यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाल्या. तर काही माध्यमांनी खात्री न करताच बातम्या सुद्धा प्रसारित केल्या. यावर खुद्द पेडणेकर यांनी ट्वीट करत, "मी जिवंत आहे आणि माझ्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थोड्याच वेळापूर्वी मी डाळ-खिचडीही खाल्ली. अशी बातमी छापणे दुर्दैवी आहे. बातमी देण्यापूर्वी ती बातमी खरी की खोटी याबाबत एकदा शहनिशा करा", असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी लिहलं होतं.मबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Updated : 20 July 2021 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top