Home > News > #Coronaupdate ; मुंबईत रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ६१ टक्क्यांनी घटली..

#Coronaupdate ; मुंबईत रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ६१ टक्क्यांनी घटली..

#Coronaupdate ; मुंबईत रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ६१ टक्क्यांनी घटली..
X

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशातील मोठ्या शहरांमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून सर्वाधिक संसर्ग असलेल्या मुंबई शहरापर्यंत रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी होत आहे. या शहरांमधील गेल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. मात्र आता मोठ्या शहरांमध्ये कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या घटू लागली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तिसऱ्या लाटेत प्रथमच देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. 23 जानेवारी रोजी देशभरात 22.43 लाख सक्रिय रुग्ण होते, जे 26 जानेवारी रोजी 21.95 लाखांवर आले आहे.

मुंबईत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या ६१ टक्क्यांनी घटली आहे.

11 जानेवारी रोजी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 8 हजार 727 कोरोना रुग्ण दाखल झाले होते. २६ जानेवारीला हा आकडा ३ हजार ३८४ वर आला. अशाप्रकारे रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येत 61% घट झाली आहे. विशेष म्हणजे तिसर्‍या लाटेत मुंबईत देशभरातील सर्वाधिक बाधित रुग्ण होते. हाच कल दुसऱ्या आणि पहिल्या लाटेतही दिसून आला.

दिल्लीत रूग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांनाच्या संख्येत 28% घट

17 जानेवारी रोजी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये 2 हजार 782 रुग्ण दाखल झाले होते. २६ जानेवारीला त्यांची संख्या केवळ २ हजारांवर आली. अशाप्रकारे, राजधानीतील रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 28% घट झाली आहे. दिल्लीतील रुग्णांच्या घटत्या संख्येचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येईल. दिल्ली सरकारने 28 जानेवारीपासून कोरोना निर्बंधांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली आहे.

Updated : 28 Jan 2022 4:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top